शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा..

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा..

ढोल,ताशा,हलगी, संबळ,भजनात दंगले शिवभक्त.

  अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विविध उपक्रमाने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला.
           सकाळी समितीच्या वतीने छत्रपतींच्या पुतळ्यास दुग्ध जल अभिषेक करून  पुजापाठ करण्यात आला. राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने
या वेळी माजी सभापती जेष्ठ नेते दिलीपराव देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद शेळके छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे सचिव डॉ सिद्धार्थ सूर्यवंशी, क्रिडा पुरस्कार विजेते प्रा.दत्ताभाऊ गलाले, जुगल किशोर शर्मा, सिनेट सदस्य एडवोकेट निखिल कासनाळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोकराव चापटे,उपाध्यक्ष प्रा.मारोती बुद्रुक पाटील,माजी कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नाना कदम,मुकेश पाटील, गणेश कोदळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
       365 दिवस शिव वंदना करणारे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सोहळ्याचे आयोजक पांडूरंग शेळके,राजू पाटील,बंटी शेळके,अक्षय माने,पांडुरंग शेळके,सिद्धार्थ दापके, वैभव सारोळे,राहुल महाळस,आनंद सोनेवाड,दीपक हरणे, नटराज गलाले,रमेश कुलकर्णी,रोहन कंधारकर,नारायण सावंत, प्रल्हाद तांबरे, सोमनाथ ताडमे,दत्ता कदम, बागल शेख,राम पाटील आदींनी पुढाकार घेऊन शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला.
         सकाळी आठ वाजता मुख्य रस्त्यावरून ढोल ताशा संबळ गोंधळी हलगी याच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली मुख्य चौकात फुलांचे उधळण केली
      यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मराठा सेवा संघाचे व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व अनेक सामाजिक धार्मिक संघटनाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!