निरोगी आरोग्यातून रोजगाराचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ‘ प्रिस्टाइन’ कार्यरत- आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बडे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड, ( गोविंद काळे)
भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आरोग्य आणि रोजगाराची समस्या भेडसावत आहे.जगातल्या प्रत्येक देश ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.ही समस्या सोडविण्यासाठी प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रा.लि.कार्यरत असून आत्तापर्यंत असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्यासह लाखो कुटुंबातील सदस्यांनी प्रिस्टाइनच्या प्रोडक्टद्वारा रोगमुक्त केले आहे असे प्रतिपादन उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बडे यांनी केले.
३५० शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ.प्रवीण बडे हे पिंपरी चिंचवड येथील प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रा.लि.च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रिस्टाइन कंपनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नहमेळाव्यात बोलत होते. यावेळी राज्याच्या कानोकोप-यातून प्रिस्टाईन परिवारातील सदस्य, कंपनीची कोअर कमिटी,प्रिस्टाइन कंपनीच्या प्रोडक्टचे लाभधारक यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कंपनीचे ट्रेनर व ख्यातकीर्त तसेच आंतरराष्ट्रीय ट्रेनर संतोष सपकाळ यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सपकाळ यांनी मराठी माणसांचं आणि मार्केटिंगचं नातं कशा प्रकारचे आहे हे जगात प्रचंड स्पर्धा आहे हे सांगून संधीवर झडप घालून संधी ताब्यात घ्यायची असे नमूद केले.
यावेळी कोणताही आजार हा मुळातूनच घालवला पाहिजे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो असे मानून चांगली नाते क्वालिटी व नीत्तिमत्ता चांगली असेल तर माणसं जोडली जातात.येणारा काळ भयंकर असून आपल्याला घराघरात पोहचायचे आहे.तसेच आरोग्य,सक्ष्मीकरण, शिक्षण आणि चॅरिटी हे आपलं ध्येय आहे असे म्हणून प्रिस्टाईन चॅरिटी फांऊडेशनच्या माध्यमातून १२००लोकांना दत्तक घेतले गेले असून आता आपले स्वतःचेच एक विद्यापीठ आणि महाविद्यालय काढणार असल्याची घोषणा यावेळी डॉ.बडे यांनी केली.
प्रिस्टाइनच्या चौथ्या वर्धापनदिन प्रारंभी डॉ.प्रवीण बडे व कोअर कमिटी कडून दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर कु.श्रावणी पवार हिने गणेश वंदना विलोभनीय नृत्यासह सादर केली.मयुरी भाटे यांच्या संचाने हार्मोनियमच्या सहाय्याने सुरेल आवाजात स्वागतगीताने वातावरण मंत्रमुग्ध केले.त्यानंतर संत गजानन महाराज दिघीच्या विश्वस्तांचा, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रिस्टाइन कंपनीची प्रोफाइल कंपनीचे एमरॉल्ड सचिन पवार यांनी तर प्रिस्टाइनच्या प्रोडक्टचे फायदे सविस्तर पणे दिप्ती खांडके यांनी उपस्थितांसमोर विशद केले. यावेळी जीवन भिसे, पल्लवी ननावरे, रूपाली तांबे, शिवाजी घाटोळ यांनी प्रोडक्टचे आपल्याला झालेला फायदा कथन केला.
मान्यवरांचा प्रिस्टाइन आयुर इंडिया कंपनीकडून सन्मान –
यावेळी प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रा.लि.च्या वतीने फंड अचिव्हर्स रॉयल्टी ॲचिव्हर्स, एमरॉल्ड सचिन पवार,ॲचिव्हर्स, रूबी ॲचिव्हर्स आणि डायमंड बापूसाहेब काळे यांच्यासह कंपनीचा सर्व स्टाफ यांचा कंपनीच्या वतीने सत्कार केला.यात उज्वलाताई सावंत, राजेंद्र बळे,गजानन मोरे, मेजर आंग्रे,सापते, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी मनोगत व्यक्त करून प्रिस्टाइनच्या प्रगतीसाठी व लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी सतत कार्यरत राहू असे म्हटले. या नंतर डायमंड तानाजी माने यांनी आपल्या ग्रुपच्या वतीने कमीत कमी दहा हजारांपासून ते जास्तीत जास्त बी.व्ही. चे उद्दिष्ट गाठणा-यांना विविध दर्जेदार बक्षिसे जाहीर केले होते ते उद्दिष्ट पूर्ण करणा-यांना ती प्रदान करून प्रोत्साहित केले.शेवटी या वर्धापन दिनानिमित्त सौ.शैलाताई बडे ताई, डॉ.प्रवीण बडे, त्यांची कृष्णल व दुसरी कन्या आणि सर्व प्रिस्टाइन परिवारांने एकत्र येऊन केक वाढवला.
या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत सूत्रसंचलन सोपान पानझडे व सौ. सुनीता गायकवाड यांनी केले. शेवटी डायमंड तानाजी माने यांनी आभार मानले.