गिरीधर तपघाले यांच्या हत्या प्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्वरित बडतर्फ करावे

गिरीधर तपघाले यांच्या हत्या प्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्वरित बडतर्फ करावे

अहमदपूर ( गोविंद काळे ) गिरीधर तपघाले रा. तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील हत्या प्रकरणातील दोषी असणाऱ्या पोलीस निरीक्षक व त्यांच्या साथीदाराची चौकशी अंतिम तात्काळ बडतर्फ करून *मयताच्या कुटुंबीयांना अत्याचार प्रतिबंधक कायद्या व्यतिरिक्त रुपये 25 लाखाची आर्थिक मदत करून एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे असे निवेदन शिवसेना ठाकरे गट व मातंग समाजाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले

दलित कुटुंबातील गिरधर तपघले व त्यांच्या दोन्ही मुलांनी सावकाराचे तीन हजार रुपये व्याजाने घेतले होते त्याचे व्याज म्हणून वीस हजार रुपये परत देण्यात आले होते परंतु आणखीन माझे पैसे तुझ्याकडे आहेत म्हणून घरात घुसून मातंग कुटुंबियांना मारहाण केली होती मारहाण केल्यामुळे घरातील सर्वांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन ते दि 23 मे रोजी संबंधीत व्यक्ती विरोधात रेणापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद घेऊन गेले होते परंतु तेथील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची फिर्याद न घेता त्याला मेडिकलला जाऊन तुझा इलाज करून घे म्हणून पत्र देऊन शासकीय रूग्णालयात पाठवले असता पुन्हा दिनांक 2 जुन रोजी सकाळी साडेसात वाजता आरोपी लक्ष्मण मार्कड व प्रशांत वाघमोडे हे गिरीधारीच्या घरी जाऊन आत्ताच्या आत्ता पैसे दे म्हणून त्यांच्या डोळ्यात मिरची टाकून रॉड व काठीने त्याला व त्याच्या मुलांना नातेवाईकांना जबर मारहाण केली त्यामध्ये गिरधर गंभीर जखमी झाला त्यानंतर गिरधर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर दि 3 जुन रोजी पहाटे त्यांच्या मृत्यू झाला पोलिसांनी दि 23 मे रोजी फिर्यादीची फिर्याद घेतली असती आरोपीवर *कायदेशीर कारवाई केली असती तर गिरीधर तपघालेचा जीव वाचला असता व त्यांच्या कुटुंबावर ही पाळी आली नसती पोलीस निरीक्षक दीपक शिंदे व त्यांचे चार साथीदार पोलीस जमादार अंकुलगे, ऊस्तुर्गे, कन्हेरे या पोलीस साथीदारांची चौकशी अंती तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा व मयताच्या कुटुंबीयांना अत्याचार प्रतिबंधक कायद्या व्यतिरिक्त 25 लाख रुपयाची आर्थिक मदत करून कुटुंबीयातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीवर घेण्यात यावे असे नाही झाले तर जनहितार्थ लोकशाही मार्गाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मातंग समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल याची गंभीर नोंद घेण्यात यावी असे निवेदन तहसीलदार अहमदपूर यांच्यामार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, हरगीले कोंडीबा, दीपक कांबळे, अंतराम जंगापले, अनिल गुंडीले, संतोष अधटराव, सूर्यवंशी संतोष, अजय सुरनर, राजू कलवले सुनील हरगिले, माऊली देवकते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

About The Author