४ किमी रस्ता कामाचे लोकार्पण आणि मुस्लिम इदगाह संरक्षण भिंत कामाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

४ किमी रस्ता कामाचे लोकार्पण आणि मुस्लिम इदगाह संरक्षण भिंत कामाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील मौजे मांडणी येथे मातोश्री पाणंद रस्ता योजना अंतर्गत ४ किलोमीटर रस्ता कामाचे लोकार्पण आणि मूलभुत सुविधा योजना अंतर्गत मुस्लिम इदगाह संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती संचालक मंडळाचा सन्मान केला.

मांडनी ते उनी, मांडणी ते वळसंगी, मांडणी ते हिप्पळगाव या तीन गावांना जोडणारा रस्ता ग्रामस्थांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न सोडविताना आनंद होत आहे. मातोश्री पाणंद रस्ता ४ किमी लोकार्पण केल्याचे समाधान वाटले. येणाऱ्या काळात मतदारसंघातील रस्ते मजबूत करून शेतकऱ्यांना जीवनात प्रगती करून शेतकरी हित साधण्याचा प्रयत्न करेल असे मत आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच भगवान तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समिती नुतन सभापती मंचकरावजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, माजी सभापती चंद्रकांतजी मदे,चाकूर ता.अध्यक्ष शिवाजीराव काळे, उपसभापती संजयजी पवार, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, माजी जि.प सदस्य माधवरावजी जाधव, नागमोडे साहेब, संचालक सतीशराव नवटके, जिल्हा सरचिटणीस गोपनाथराव जोंधळे, ता सरचिटणीस तानाजी राजे, उत्कर्ष भैय्या वाघ, सरपंच भगवानराव तुपकर, माधव तुपकर, माधवराव गुंडरे मामा, पोलीस पाटील, माधवराव पाटील, किशनजी काळे, राजकुमार आडाव, तानाजी गायकवाड, विनायकराव तुपकर, बबन शेख, सरवर शेख, उपसरपंच सागर आडाव, श्रीराम पाटील, गोपिनाथ काळे, माधव तेलंगे, संभाजी गायकवाड, शंकर पवळे, ज्ञानोबा काळे, बच्चू भाई शेख, बापूराव कदम, अशोक कोदळे, पांडुरंग कोकले आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author