शहरातील नाल्यांची सफाई करा अन्यथा सेना स्टाईल अंदोलनाचा इशारा

शहरातील नाल्यांची सफाई करा अन्यथा सेना स्टाईल अंदोलनाचा इशारा

अहमदपुर ( गोविंद काळे ) शहरातील काॅलेज रोड, थोडगा रोड, मेन रोड यासह विविध भागात नगरपालिकेच्या वतीने नाल्यांची सफाई करण्यात आली नाही तात्काळ नाले सफाई करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ, काॅलेज रोड, थोडगा रोड, मेन रोड यासह विविध भागातील गल्ली बोळात नगरपालिकेने नाल्यांची सफाई केली नसल्यामुळे शाळकरी मुलांना, व्यापाऱ्यांना, वाहन धारकांना, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे, सध्या पावसाळा सुरू होत आहे, पहिल्याच पावसात सर्व नाल्या तुंबल्यामुळे कचरा सर्वत्र पसरुन आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. यासाठी नगरपालिकेने तात्काळ नाल्यांची सफाई करुन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, शहर प्रमुख शिवा कासले, उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, ॲटो सेनेचे शहर प्रमुख ज्ञानेश्वर मस्के, अमोल मोरे, सुनील कदम,सोनू डुकरे,माणीक गुट्टे, जयपाल बार्शीकर,राजू बनसोडे, अखिल शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!