विशेष पोलीस महानिरीक्षक यांना सम्राट मित्र मंडळाचे निवेदन

विशेष पोलीस महानिरीक्षक यांना सम्राट मित्र मंडळाचे निवेदन

नांदेड परिक्षेत्र DIG डाॅ.शशिकांत महावरकर यांची भेट घेवून विविध मागण्यांचे दिले निवेदन

अहमदपूर ( गोविंद काळे )
बोंडार हवेली ता.नांदेड येथे झालेल्या हत्यांकाडातील आरोपींवर कठोर कारवाई करावी,उमरगा कोर्ट जयंती अडवणूक प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच अहमदपूर चाकूर येथील पोलीस विभागाच्या समस्या तातडीने सोडवावेत आदी मागण्यांचे निवेदन सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या वतीने नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. शशिकांत
महावरकर यांच्याकडे केली आहे.
सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर चे अध्यक्ष डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिले.
या निवेदनात पूढे म्हटले आहे की,
बोंडार हवेली ता.जि.नांदेड येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा राग मनात धरुन जातियवाद्यांनी भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या केलेल्या आरोपींना तातडीने कठोर शासन करावे,या प्रकरणासाठी तज्ज्ञ तपास अधिकारी नेमावा,सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे,यासाठी तज्ज्ञ विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी,तपासामध्ये अनेक पुरावे जमा करून आवश्यक्त तेथे विविध कलमाची वाढ करावी, मयताच्या कूटूंबास तातडीने आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे आदी मागण्या आहेत.
तसेच अहमदपूर तालुक्यातील मौजे उमरगा कोर्ट येथे पोलीस बळाचा वापर करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक बंद केलेल्या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. अहमदपूर चाकूर तालुक्यातील पोलिस विभागाच्या संबंधाने विकासाच्या संबंधाने प्रलंबीत असलेले प्रकरणे तातडीने मार्गी लावावेत आदींचा यात समावेश होता.
या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर साहेब यांनी शिष्टमंडळाच्या संपूर्ण मागण्या ऐकुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आदेश संबंधीतांना दिले.
या शिष्टमंडळात युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,माजी कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,पत्रकार अजय भालेराव,भिमराव कांबळे ,जिल्हाध्यक्ष गणेशराव मूंडे,सचिन बानाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author