शिवस्वराज्य दिनातून युवकांना प्रेरणा मिळेल- डॉ संदीप जगदाळे

शिवस्वराज्य दिनातून युवकांना प्रेरणा मिळेल- डॉ संदीप जगदाळे

दयानंद कला महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याची महती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने या वर्षीपासून शिवस्वराज्य दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचे औचित्य साधून दयानंद कला महाविद्यालयात कोरोनाचे नियम पाळून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात आला.प्रारंभी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड व डॉ शिवाजी जवळगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
या प्रसंगी राज्यमंडळ व अधिसभा सदस्य डॉ संदीप जगदाळे म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले.वयाच्या ४४ व्या वर्षी म्हणजे ६ जून १६७४ रोजी त्यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शिवराय ३२ मण सोन्याने मढवलेल्या सिंहासनावर विराजमान झाले. या सोहळ्यात त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले म्हणून त्यांना छत्रपती म्हणतात.छ.शिवाजी महाराज जाणता राजे होते. ते उत्तम प्रशासक होते,पर्यावरण संरक्षक व आदर्श वास्तुविशारद होते.ते अंधश्रद्धा निर्मूलक होते.स्वराज्य स्थापनेनंतर त्यांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण केले.चलनासाठी सोन्याचे होन व तांब्याचे शिवराई हे चलन तयार केले.त्याचे कार्य अत्यंत प्रेरक असून त्यातून युवकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.'”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड हे होते.अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे सर्वत्र मराठा साम्राज्य स्थापन झाल्याचे जाहीर करणे शक्य झाले.त्यांनी राबविलेल्या योजना लोकहिताच्या होत्या.महाराष्ट्र शासनाचा शिवस्वराज्य दिनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून प्रत्येकांनी या दिवशी छ.शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यातून स्फुर्ती घ्यावी “
या कार्यक्रमासाठी डॉ शिवाजी जवळगेकर,डॉ प्रदीप सूर्यवंशी, डॉ रमेश पारवे,डॉ सुनील साळुंके,डॉ रामेश्वर खंदारे,डॉ सुनीता संगोले,डॉ प्रशांत मान्नीकर,डॉ नितीन डोके,प्रा सुरेश क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव आदी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

About The Author