संत तुकाराम विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. ॲड. राजकुमार नांवदर यांची निवड

संत तुकाराम विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. ॲड. राजकुमार नांवदर यांची निवड

उदगीर (प्रतिनीधी) उदगीर येथील बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, अहमदपुर द्बारा संचलित संत तुकाराम विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा. ॲड राजकुमार प्रेमसुख नांवदर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव व सचिव आ. बाबासाहेबजी पाटिल यांच्या नियुक्ती पत्राने प्रभारी प्राचार्य पदी प्रा.ॲड. राजकुमार नांवदर याना नियुक्ती देण्यात आली .
त्या अनुषंगाने संत तुकाराम विधी महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी प्रा.ॲड. सुरेश मुदुडगे तर प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्रा. ॲड. झेड. के. जागीरदार ,प्रा. व्ही.व्ही.शिदे,प्रा. ॲड. जे.बी. भाले , प्रा. अविनाश शेटकार ,प्रा.ऍड.संतोष सुभेदार,प्रा.ॲड दिप्ती नांवदर , प्रा.आश्विनी पाटील ,प्रा.विनोद गव्हाने ,वरिष्ठ लिपिक अजय कांबळे,निळकंठ कानवटे,संभाजी कांबळे,माधव कलवले, संजय वाघमारे, रोशन मुल्ला,नामवाड देवानंद, याच्या उपस्थितीत प्रा. ॲड. राजकुमार नांवदर यांनी प्राचार्यपदाचा पदभार स्विकारला. यावेळी सुत्र संचलन प्रा. ॲड. जयवर्धन भाले यानी केले तर आभार प्रदर्शन अविनाश शेटकार यानी मांडले.

About The Author

error: Content is protected !!