राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मानखेड येथे आरोग्य शिबीर
अहमदपूर( गोविंद काळे ) राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त व ग्रामस्थ बाबुराव सांगुळे यांच्या समृत्यर्थ अहमदपूर तालुक्यातील मानखेड येथे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लक्ष्मणराव देशमुख व ग्रामीण रुग्णालय अहमदपूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ बिराजदार यांच्या समन्वयातुन मोफत भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले होते.या मध्ये विविध विषयांचे तज्ञ असलेले दहा डॉक्टर्स,अनेक आरोग्यसेवक,सेविका,आरोग्य सहाय्यक सामील होते.तसेच या शिबिरात मोफत रक्त लघवी तपासणी,रुग्णांना मोफत औषधी वाटप याचाही समावेश होता.येथील आरोग्य शिबिराचा फायदा मानखेड,सोनखेड,पाटोदा या गावच्या शेकडो रुग्णांनी घेतला व मोठा प्रतिसाद दिला.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शेशुपाल भिकाणे तर प्रमुख पाहुणे सचिन भिकाणे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी केले,डॉ उगले एस.आर,डॉ सुरणर एन.डी.,डॉ सुडे एस.सी,डॉ सोळुंके आर.वी,डॉ सुडे एस.सी,डॉ सुगेवड पी.यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन व तपासणी केली,आभार मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे यांनी मानले व सुत्रसंचालन जीवन नवटक्के सर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकासचिव विलास पाटील,ग्रामपंचायत सदस्य संतोष नारागुडे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी सांगुळे,मनवीसे तालुका अध्यक्ष अतिष गायकवाड,मनसे तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील,विभागाध्यक्ष गजानन पांगरे,सुरेश बरुरे,चंद्रकांत सांगुळे,तुकाराम कासले, विजयकुमार भिकाणे,दिगंबर सांगुळे,कालिदास पाटील,ज्ञानोबा भिकाणे,रमाकांत जाधव,अंगद सांगुळे,बालाजी सांगुळे,राघव जोंधळे,जय गायकवाड आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.