माकणी -खरबवाडी साठवण तलावातील मगर वन अधिकार्यांनी पकडली नागरीकांत समाधान
शिरूर ताजबंद – ( गोविंद काळे )अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळील माकणी – खरबवाडी साठवन तलावात गेल्या वर्षापासून अढळून येत असलेली भयंकर मोठी मगर अढळून आल्याने तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या सुचनेवरून अहमदपूर वन विभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ जावून ग्रामस्थांच्या सहकार्याने मगर पकडून घेवून गेले . यामुळे खरबवाडी – माकणी येथील सरपंच – ग्रामस्थांच्या वतीने वन कर्मच्यारांचा सत्कार करण्यात आला . यावेळी शिरूर ताजबंद चे मंडळ अधिकारी विशाल केंचे , तलाठी मुकूंद सुडके, खरबवाडी ग्रामसेवक रसाळ, वनरक्षक होनराव विश्वनाथ, वनरक्षकअंबुलगेकर चाकूर,वन अधिकारी अहमदपूर गोविंद माळी, रामेश्वर केसाळे, सुरेश मस्के, वनरक्षक अहमदपूर बि. एच . गडकर खरबवाडी सरपंच प्रविन जगताप , माकणी चे उपसरपंच भरत येरमे सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते . मगर अढळून आल्यानंतर शेतक-यांच्या सतर्कतेमुळे कर्मचार्यांनी पकडून घेवून गेले . यामुळे नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे