पु. अहिल्यादेवीचे नीटच्या परीक्षेत नेत्रदीपक यश

पु. अहिल्यादेवीचे नीटच्या परीक्षेत नेत्रदीपक यश

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सांगवी(सु) येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या नीटच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सय्यद सादिया महेताब हिने नीट परीक्षेत ५६५ गुण, हाके भक्ती माणिक हिने ५४१ गुण,साळवे यशवंत भीमराव याने ४१८ गुण घेत नेत्रदीपक यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई हाके पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, कोषाध्यक्ष अमरदीपजी हाके, संचालक सुरेंद्र चाकूरकर आदींनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!