विळेगाव शिवारात भाजपच्या जनसंपर्क अभियाना अंतर्गत सहकार मंत्री अतुलजी सावे यांच्या उपस्थितीत टिफिन बैठक संपन्न.
अहमदपुर ( गोविंद काळे ) भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान होऊन 9 वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महा जनसंपर्क अभियान 30में ते 30 जून या कालावधीत राबविले जात आहे. जनसंपर्क अभियाना अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे जनसंपर्क अभियानाचे प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने मौजे विळेगाव शिवारातील राजकुमार शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुलजी सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची टिफिन बैठक संपन्न झाली. अहमदपूर व चाकुर तालुक्यातील एक हजार कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरुन जेवण्यासाठी टिफिन (डब्बा) आणुन नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करत जेवण केले.
यावेळी जनसंपर्क अभियानाचे लातूर जिल्हा प्रमुख खासदार सुधाकरजी श्रृगांरे,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड,माजी मंत्री विनायकराव पाटील,भाजपाचे प्रदेश चिटणीस प्रा. किरण पाटील,मराठवाड्याचे संघटनमंत्री संजयजी कौडगे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी आमदार सुधाकर भालेराव,भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे,माजी सभापती आर. डी. शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकआबा गुट्टे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिवणकुमार मद्देवाड,अमोल पाटील, भागवत सोट,
चाकुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरकले ,माजी सभापती प्रशांत पाटील,माजी उपसभापती अशोक दादा चिंते,बालाजी पाटील चाकुरकर,समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,प्रविण रेड्डी,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,अॅड.अमित रेड्डी.चेअरमण शंकर अप्पा भालके, बाबुराव बावचकर,राजकुमार खंदाडे,सुधीर गोरटे,राहुल शिवपुजे,किशोर कोरे, अॅड.निखील कासनाळे,माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे,रामभाऊ नरवटे, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी ,माजी उपसभापती कमलाकर पाटील,निळकंठ पाटील,यतिराज केंद्रे,विलास पाटील,व्यंकट पाटील,चंद्रप्रकाश हंगे,बालाजी पडोळे, देवीदास सुरणर, प्रशांत जाभाडे,माणीक नरवटे, रामानंद मुंडे, शंकर देवकते,नागनाथ माने, राजू कदम,शिवकुमार घोटे, राजकुमार कांडणगिरे, बाबाराव बारवाड, अतुल रेड्डी,राम देवकते,
यांच्यासह अहमदपूर व चाकुर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते