निवाडा गावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही– आ. रमेशअप्पा कराड

निवाडा गावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही– आ. रमेशअप्पा कराड

लातूर (प्रतिनिधी) : निवाडा हे गाव लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या काळापासून भाजपावर प्रेम करणारे गाव आहे. या गावच्या विकासाची अनेक कामे केली, या पुढील काळातही निवाडा गावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.

रेणापूर तालुक्यातील मौजे निवाडा येथील सिमेंट रस्ता, पांदण रस्ता, मंदिर संरक्षण भिंत, बौद्ध विहार यासह इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आ. रमेशअप्पा कराड यांच्या शुभहस्ते रविवारी झाले. निवाडा ग्रामस्थांनी आ. कराड यांचे वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमास प्रदेश भाजपाचे अनिल भिसे, भागवत सोट, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे, संगायो समिती अध्यक्ष वसंत करमुडे, शरद दरेकर, भागवत गिते, श्रीकृष्ण पवार, गोपाळ शेंडगे, उत्तम चव्हाण, अनुसया फड, शीला आचार्य, सरपंच वंदना साळुंके, चेअरमन दिलीप उरगुंडे, उपसरपंच महादेव कोंडूळे, शिवमूर्ती उरगुंडे, संगमेश्वर स्वामी, नंदकुमार साळुंके, विठ्ठल कसपटे, पृथ्वीराज उरगुंडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केलेल्या विविध कामाची सविस्तरपणे माहिती देऊन शासनाच्या विविध विभागामार्फत लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात शेकडो कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून आणल्याचे त्यांनी सांगितले.

संगमेश्वर महादेव मंदिर संरक्षण भिंतीचे अपूर्ण काम येत्या तीन-चार महिन्यात पूर्ण करून देण्यात येईल खंडोबा मंदिर परिसरात दिवाळीपर्यंत सभागृहाची उभारणी केली जाईल असे सांगून शासनाच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत मुस्लिम बांधवांकरिता वर्षभरात शादीखाना व्हावा याकरिता निश्चितपणे प्रयत्न केला जाईल असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, काँग्रेसने आजपर्यंत खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली मात्र गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या अडी अडचणी समजून घेऊन सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कायम बांधील असून आज अनेक योजनांचा गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे यांनी रेणापूर तालुक्यात आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातूनच विविध विकास कामांना गती मिळाल्याचे आणि निधी उपलब्ध झाल्याचे बोलून दाखविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव बनसोडे यांनी केले प्रारंभी आ. रमेशअप्पा कराड यांचा निवाडा ग्रामपंचायत, सोसायटी, धनगर समाज बांधव आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास अविनाश रणखांब, अजित गायकवाड, चंद्रकांत कातळे, श्रीमंत नागरगोजे, दिलीप घोडके, लक्ष्मण खलंग्रे, मेघराज बडे, रत्नमाला घोडके, उमाताई सूर्यवंशी, उज्वलाताई स्वामी, रसूल शेख, राजाभाऊ नवाडे, प्रल्हाद साळुंखे, सदाशिव बनसोडे, सुरेश गिरी, हरिभाऊ साळुंखे, ज्योतीराम पालकर, हरिभाऊ कसपटे यांच्यासह गावातील सर्व स्थरातील नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author