तळ्यात गेलेल्या मातीचा उपसा करण्याच्या शुल्लक कारणावरून भावा भावात हाणामारी आणि विनयभंग
उदगीर (एल.पी.उगीले )
उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत भावाभावातील वादाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे याप्रकरणी फिर्यादी संतोष दत्तात्रय पाटील वय 32 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार आडोळवाडी तालुका उदगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 137 23 कलम 354 324 323 504 34 भारतीय दंड विधान संहिता अनुसार आरोपी फिर्यादीचा मोठा भाऊ आप्पाराव दत्तात्रय चिकलचांदे उर्फ पाटील, बालाजी काळे गोविंद काळे शुभम आप्पाराव चिकलचांदे राहणार आडुळवाडी तालुका उदगीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की आडोळवाडी येथील ग्रामपंचायत फिर्यादी हा घटनास्थळाकडे जाऊन पाहणी करत असताना यातील आरोपी त्यांनी संगणमत करून फिर्यादीचा भाऊ कमलाकर यास हातात दगड घेऊन पाठीत मुक्कामार देत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीची भावजय हिला देखील आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या भाऊजी छातीला वाईट उद्देशाने हात लावून मिळेल बंद करून लाताबुक्याने मारहाण करत असताना फिर्यादी सोडवण्यासाठी गेला असता आरोपींनी शिवीगाळ करून तळ्यात गेलेल्या शेतातील मातीचा उपसा करतोस काय म्हणून हातात दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच पुन्हा कमलाकर यास आरोपी त्यांनी व हातात विटा घेऊन मुक्का मार दिला अशा आशयाच्या एम एल सी जबाबदावरून वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नायक केंद्रे हे करत आहेत. किरकोळ कारणावरून भावा भावातील हा टोकाला गेलेला वाद पाहून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.