भाजपाच्या नुतन महिला जिल्हाअध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर यांचा सत्कार.

भाजपाच्या नुतन महिला जिल्हाअध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर यांचा सत्कार.

अहमदपूर( गोविंद काळे )
भारतीय जनता पक्षाच्या महिला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर यांची नुकतीच निवड झाल्याने भारतीय जनता पक्षाचे अहमदपूर विधानसभा प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील व सौ. सुनीताताई पाटील यांनी मौजे काळेगाव येथील निवासस्थानी सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर यांचा कौटुंबिक सत्कार करुन पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
लातूर येथील भारतीय जनता पक्षाच्या संवाद कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड यांनी सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर यांना महिला जिल्हा अध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र देऊन सन्मानित केले होते. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकआबा गुट्टे, विक्रम शिंदे यांची उपस्थिती होती.
भाग्यश्रीताई क्षिरसागर यांना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने माजी मंत्री विनायकराव पाटील व सौ. सुनीताताई पाटील यांनी मौजे काळेगाव येथील निवासस्थानी कौटुंबिक सत्कार करुन पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी,
नागनाथ माने, वेंकट कुंटे, चंद्रकांत रुकमे, नारायण शिंदे, श्याम कल्याणी, अरविंद कापसे, अंकुश क्षीरसागर.विठ्ठल मुळे यांच्या सह अनेक जण उपस्थितीत होते.

About The Author