दहावी बोर्ड परीक्षेत यशवंत विद्यालयातील 100% गुण घेणाऱ्या 18 गुणवंत विद्यार्थ्यांची आकाशवाणीवर मुलाखत
अहमदपूर ( गोविंद काळे )
शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयातील 18 विद्यार्थी 100 %गुण घेऊन राज्यात आपल्या शाळेचा ठस्सा उमटविला आहे.यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेचे नाव महाराष्ट्रात गाजले आहे.यामुळे आँल इंडिया रेडिओचे परभणी आकाशवाणी केंद्रावर दि.20 जून रोजी सकाळी 11वाजता बालमंडळ या कार्यक्रमात गुणवंत 18 विद्यार्थ्यांचे मुलाखत संपन्न होणार आहे.
वर्षभर विद्यार्थ्यांने कशा पद्धतीने आभ्यास केला,शाळेतील शिक्षकांचे कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभले.संस्थेने शाळेच्या उन्नतीसाठी केलेले वार्षिक नियोजन या सर्व गोष्टीचे चर्चासत्र या मुलाखती उलगडणार आहे.विद्यार्थ्यांनासह शाळेचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.गंपले,मराठी विभाग प्रमुख रामलिंग तत्तापुरे,विज्ञान विभाग प्रमुख सुनिल धनुरे,क्रीडा प्रमुख संतोष कदम,कलाध्यापक महादेव खळुरे यांनी शाळेतील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी केलेले विविध उपक्रम याबाबतीत संवाद साधला आहे.
विद्यालयातील 100% गुण घेणारे विद्यार्थी कु.संस्कृती नागरगोजे, कु.वैष्णवी बिराजदार ,किरण गुट्टे, कु.आर्या देशमुख , शिवहर दहिफळे, सुरज हेमनर, शशांक गायकवाड, रमण गुरमे, अजिंक्य मुसळे, कु.आर्या गुळवे, कु.भक्ती गुरुडे, कु.श्वेता सूर्यवंशी, ऋषिकेश केंद्रे , कु.सृष्टी नलाबले, कैलास चाटे, कु. संध्याराणी भाले, कु.श्रावणी इप्पर, कु. सृष्टी पाटील यांनी मुलाखत दिली आहे.
आकाशवाणी वर मुलाखत दिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक गजानन शिंदे, सोमनाथ स्वामी, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.