महात्मा फुले महाविद्यालयात महाकवी कालिदास जयंती साजरी
अहमदपूर, ( गोविंद काळे)
संस्कृत भाषेचे कवी कुलगुरू,’ मेघदूत’कार महाकवी कालिदास यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी संस्कृत विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संयोजक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले , तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. डी.एन. माने, प्रा. आतिश आकडे, डॉ.पांडुरंग चिलगर, डॉ. संतोष पाटील, डॉ. सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.