‘जी-20 समीट’ अंतर्गत आयोजित विभागस्तरीय ‘रन फॉर एज्युकेशन’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जी-20 समीट’ अंतर्गत आयोजित विभागस्तरीय ‘रन फॉर एज्युकेशन’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर (एल.पी.उगीले) : सन 2023-24 च्या ‘जी-20 समीट’चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त विविध विषयांवर ‘जी-20 समीट’चे आयोजन करण्यात येत आहे. ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे विभागस्तरीय ‘रन फॉर एज्युकेशन’ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून रॅलीला सुरुवात झाली.
विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ .गणपत मोरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी, विभागीय शिक्षण सहसंचालक दत्तात्रय मठपती, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, वरिष्ठ अधिव्याख्याता विजयकुमार सायगुंडे व डॉ. जगन्नाथ कापसे, अधिव्याख्याता डॉ.योगेश सुरवसे, इमाम मिर्झा, डॉ. राजेश गोरे, मुकुंद दहिफळे, संतोष ठाकूर, शरीफ शेख, व जिल्हा स्काऊट व गाईड अधिकारी श्री. चामे, गट शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, जिल्हा समन्वयक सतीश भापकर व सुनील राजुरे विषय सहायक निशिकांत मिरकले, गिरीश माने, प्रज्ञा आव्हाड यावेळी उपस्थित होत्या. तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतलेली सृष्टी जगताप रॅलीमध्ये सहभागी झाली होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथून सुरुवात झाल्यानंतर अशोक हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये इयत्ता नववी आणि दहावीचे सुमारे 400 विद्यार्थी सहभागी झाले.
रॅलीच्या समारोप प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाच्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांनी प्रास्ताविक केले. विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संदर्भात सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सतीश भापकर यांनी केले, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी आभार मानले.

About The Author