कै. भगवानराव नागरगोजे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे ) माजी आमदार कै. भगवानराव नागरगोजे यांच्या स्मरणार्थ नवजीवन हॉस्पिटल येथे दि. २१ जून रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक आबा गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश पेड सामाजिक कार्यकर्ते उमाकांत कासनाळे, शिवराज पाटील ,श्रीकांत भुतडा, राजकुमार मजगे, मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अहमदपूर विधानसभेचे माजी आमदार कै. भगवानराव नागरगोजे यांच्या स्मरणार्थ अहमदपूर येथील नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रकांत उगीले यांच्या वतीने दि. 21 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी लातूर यांनी रक्त संकलन केले यावेळी शहरातील जवळपास 25 रक्तादात्यांनी रक्तदान केल्याची माहिती डॉक्टर चंद्रकांत उगले यांनी दिली या शिबिरासाठी मेडिकल ऑफिसर बि.डी दाताळ लॅब टेक्निशियन जी.जी सुतार, एस जी जवादे सहाय्यक प्रकाश माने, वाहन चालक भागवत लहाने सामाजिक कार्यकर्ते अशोक जानराव आदींनी सहकार्य केले