विद्यावर्धिनी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील विद्यावर्धिनी विद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योगा दिन आज २१ जून रोजी विद्यालयात साजरा करण्यात आला. योगा हे भारतीयांनी जगाला दिलेली देन आहे. शारीरिक , मानसिक व आध्यात्मिक योगाची सुरुवात प्राचीन काळापासून भारतात झालेली आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात योगाचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार होत आहे दैनंदिन योगाची लोकप्रियता वाढतच आहे. आज विद्यालयात योग शिक्षिका अर्चना माने मॅडम यांनी योगाचे विविध प्रकार व सूर्यनमस्कार याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या योगांचा लाभ घेतला व योगा दैनंदिन करण्याचा निर्धार केला. प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांनी आपल्या जीवनात योगाचे महत्त्व किती महत्वपूर्ण आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश जाधव सरांनी केले तर आभार प्रियंका पवार मॅडम यांनी मानले.