आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन योगासन व प्राणायाम घेऊन साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराव देशमुख भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस , प्रा. हनुमंत देवकते, दत्तात्रय जमालपुरे, दत्ता गोरे, बबलू भाई पठाण, आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक डॉ. मधुसूदन चेरेकर, योग शिक्षिका ब्रह्माकुमारी राजयोगिनी छाया बहन, योग शिक्षिका प्रेमा वतनी, सुनीता इरफळे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी योग शिक्षक डॉक्टर मधुसूदन चेरेकर यांनी योग प्रार्थना, पूरक हालचाली, दंड स्थितीतील आसणे, बैठक स्थितीतील आसणे, कपालभाती, प्राणायाम, ध्यानस्थिती, ताडासन ,वृक्षासन, पादहस्थासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन ,भद्रासन, वजीरासन , अर्ध उष्टासन, उष्टासन, शंकासन, उत्तम मंडूकासन ,वक्रासन, कपालभाती ,भ्रमरी प्राणायाम, शांतीपाठ इत्यादी आसने विद्यार्थी व शिक्षकांकडून करून घेतले.
प्रारंभी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन संस्था अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांनी सूत्रसंचालन शारदा तिरके यांनी तर आभार मीना तोवर यांनी मांनले. योग सोहळ्याचा समारोप पसायदानाने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.