महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
अहमदपूर,( गोविंद काळे )
येथील महात्मा फुले महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा योगाचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या योग दिनाप्रसंगी योगगुरु डॉ.बब्रुवान मोरे यांनी योगा प्राणायाम आदीच्या प्रात्यक्षिकासह योगा आणि प्राणायामाचे निरोगी जीवन जगण्यासाठी जीवनात अत्यंत महत्त्व असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आदींनी योगा आणि प्राणायाम केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रो.डॉ. अभिजीत मोरे यांनी केले तर ; आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. मारोती कसाब, डॉ. डी.एन. माने, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. एस. एच. गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रा.प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापूरे,शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.