“यशवंत विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा”.
दीर्घायुष्यी आणि आजार मुक्त जीवन जगण्यासाठी योगासने महत्त्वाचे
उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे) भारतीय संस्कृतीमध्ये अनाधिकालापासून प्राणायाम, ध्यान, योगासनेआणि मौन यांचे महत्त्व जीवनात असल्याचे सांगून मानवाला दीर्घ आयुष्यी व आजार मुक्त वाढीव जीवन जगण्यासाठी परिवारातील प्रत्येक सदस्याने योगासने आणि प्राणायाम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण फुलारी यांनी जाहीर आवाहन केले.
ते दि. 21 रोजी यशवंत शैक्षणिक संकुलात उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद आणि यशवंत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग प्रात्यक्षिक सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, योगपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी तहसीलदार डी एच दंताळे, केंद्रप्रमुख नंदकुमार कोणाले, योगशिक्षक प्रा. अनिल चवळे, योगशिक्षक गौरव चौंडा, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी श्री फुलारी पुढे बोलताना म्हणाले, की मोबाईल संस्कृतीमुळे आणि खान,पान शैलीमुळे मानवाची लाईफस्टाईल बदलली त्यामुळे नको त्यावेळी नको त्या वयामध्ये आजाराचे प्रमाण वाढलेले म्हणून आज योग दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिवसाचा शुभारंभ प्राणायाम आणि योगासनाने करावा असे सांगितले.
यावेळी प्रा. अनिल चवळे व गौरव चवंडा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मानले.
या योग सोहळयात नगर परिषदेचे अधिक्षक सतीश बिलापट्टे, पुरवठा विभागाचे डी के मोरे, महसूल चे बी.जी. अर्जुने, तलाठी प्रशांत बिराजदार, प्राचार्य दिलीप मुगळे, प्रा. मुजमील सय्यद, उपमुख्याध्यापक उमाकांत नरलडेले, परवेक्षक गजानन शिंदे , पी एस वैद्य, बी आर सी च्या कामाक्षी पवार, डी बी सुक्रे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.