समाजाचा खरा उद्धारक शिक्षक: डी आय जी मंचक इप्पर

समाजाचा खरा उद्धारक शिक्षक: डी आय जी मंचक इप्पर

अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील नागझरी ग्रामपंचयत येथे आज जि प नागझरी चे मुख्याध्यापक नागनाथ श्रीपती कुंडगिर यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रामकिशन सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी गावचे सुपुत्र डी आय जी मंचक इप्पर आयपीएस हे होते.
प्रस्तावना करताना गावचे उपसरपंच उधव इप्पर म्हणाले की, कुंडगिर सरांनी खूप चांगली शाळेची सुधारणा केली, लहान लहान विद्यार्थी घडवले. शाळे साठी आणि विद्यार्थ्यासाठी काय चांगले करता येईल या साठी सतत धडपड असायची. असे शिक्षक भेटणे म्हणजे गावचे भाग्यच.
निरोप समारंभात कुंडगिर म्हणाले की मी साडे 12 वर्ष नोकरी केली. माझ्या हातून खूप विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, कोणी नोकरी ला लागले आहेत. गावचे खूप चांगले सहकार्य भेटले आहे. आदरणीय मंचक साहेबांसारखे गावामध्ये मला येवढे दिवस विद्यार्थी घडवण्याचे काम माझ्या हातून घडले हे माझे नशीब समजतो.
प्रमुख पाहुणे डी आय जी मंचक म्हणाले की कुंडगिर सरांनी विद्यार्थी घडवण्याचे खूप चांगले काम केले आहे . विशेष म्हणजे गावची जुनी शाळा मोडकळीस आली होती शाळे साठी ठराव घेऊन नवीन शाळा मंजूर करून घेतल्या.
आणि कुडगिर सरांच्या देखरेख खाली शाळेचे बांधकाम करून घेतले तर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात चांगले बांध काम म्हणून नागझरी चे शलेची ओळख निर्माण केली. पुढे पण सरांचे हाताने विद्यार्थी घडावेत, प्रगती होत राहावी अशी सदिच्छा.
कार्यक्रमासाठी उपस्थित चेरमन अंकुश इप्पर, मंदिर संस्थान चे अध्येश बालाजी नागरगोजे, माजी उपसरपंच अंकुश अलापुरे, तंटा मुक्ती बाबू जळबा, नामदेव सूर्यवंशी, भानुदास सुर्यवंशी, श्याम सुर्यवंशी, मारुती इप्पर, गोविंद इप्पर, अडे सर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोहर इप्पर तर आभार राठोड सर यांनी केले

About The Author