सिद्धेश्वर सहकारी बँक, लिमिटेड लातूरच्या संचालक पदी प्रा. डॉ. सुनिता ताई लोहारे- चवळे यांची बिनविरोध निवड.

सिद्धेश्वर सहकारी बँक, लिमिटेड लातूरच्या संचालक पदी प्रा. डॉ. सुनिता ताई लोहारे- चवळे यांची बिनविरोध निवड.
 अहमदपूर( गोविंद काळे) लातूर येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सिद्धेश्वर सहकारी बँक, लिमिटेड, लातूरच्या संचालक पदी अहमदपूर चाकूर सर्वसाधारण गटातून प्रा. डॉ. सुनिता धुंडीराज लोहारे- चवळे यांची सन 2023 ते 2028या पाच वर्षाच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड झालेली आहे.
या यशाबद्दल त्यांचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी सभापती दिलीपराव देशमुख, टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव डी बी लोहारे गुरुजी, काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, वीरशैव महासभेचे प्रांताचे सदस्य शिवराज शेट कार, प्राचार्य व्ही व्ही गंपले, सोमनाथ स्वामी, राम तत्तापुरे, कपिल बिराजदार यांच्यासह मित्र परिवारांनी अभिनंदन व कौतुक केलेले आहे.

About The Author

error: Content is protected !!