आ. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

आ. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

उदगीर [ प्रतिनिधी ] : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा उदगीर विधान सभा मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत उदगीर शहरातील महेश प्राथमिक विद्यालय, दक्कन उर्दू विद्यालय व संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. या वेळी महेश प्राथमिक विद्यालयाचे सचिव प्रविण बिरादार, मुख्याध्यापिका प्रतिभा बिरादार , सहशिक्षक बी सी शिंदे, एन आर सूर्यवंशी, एन जी जावरे, श्रीमती एन बी भिंगोले, एस एस स्वामी, जे पी बिरादार, ए पी गायकवाड, डी डी पाटील, डेक्कन उर्दू प्राथमिकचे मुख्याध्यापक हिसामोद्दीन शेख, माध्यमिकचे मुख्याध्यापक इब्राहिम शेख, मिर्जा जबीतुला बेग, इफ्तीखार पिंचणी, डांगे खुर्शिद अहमद, अन्सारी हिसामोद्दीन, संत ज्ञानेश्वर विद्यामंदिरचे संस्थापक अध्यक्ष गोविंदराव निटुरे, मुख्याध्यापिका अनिता जगताप, भागवत पेटे, श्यामराव कुलकर्णी, उषाकिरण खुले, दयानंद सूर्यवंशी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उदगीर शहराध्यक्षा अॅड. दीपाली औटे, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष अभिजीत औटे यांनी केले . या वेळी अनिल पत्तेवार, मुरलीधर जाधव, व्यंकटराव बिरादार, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, नवनाथ जोगी, महेश भंगे, अजित खटके, सिराज मिरासी आदी उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!