ऐश्वर्या वाडीयार इंग्लंड विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेस पदवी प्राविण्यासह उत्तीर्ण
उदगीर (प्रतिनिधी) : भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर यांची नात व संस्थेच्या सदस्या सौ.मनीषाताई पाटील यांची मुलगी कु.ऐश्वर्या राजेंद्र वाडीयार ही इंग्लंडमध्ये असलेल्या बर्मिंगहॅम येथील ॲस्टन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे.
इंग्लंडमधील ॲस्टन विद्यापीठाची स्थापना इ.स.१८९५ साली झाली. चांगल्या प्लेसमेंटसाठी व गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी हे जगातील एक महत्त्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. जगातील उत्कृष्ट उद्योजकीय विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाचा गौरव केला जातो. इंटरनॅशनल बिझनेस पदवी घेतल्यामुळे चांगल्या विद्यापीठातून एम.बी.ए.करता येते. मोठमोठ्या ठिकाणी मॅनेजर म्हणून व स्वतंत्र असा स्वतःचा व्यवसायसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतो.
कु.ऐश्वर्या वाडीयार याने चौथी ते बारावी पर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथून पूर्ण केले. बी.ए. सेंट फ्रान्सिस फॉर वुमन महाविद्यालयातून घेतले. तसेच ऐश्वर्याला बास्केटबॉलमध्ये विशेष आवड असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपली चमक दाखविली. विद्यापीठाच्या टीमकडून ऑक्सफर्ड व केंब्रिज सारख्या विद्यापीठातील खेळाडू सोबत त्यांनी खेळाचे प्रदर्शन केले.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आजोबा ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, वडील मा.राजेंद्र वाडीयार, आई सौ.मनीषाताई पाटील, भाऊ ॲड.गौरव वाडीयार, कुटुंबातील सदस्य, शिक्षक वृंद व मैत्रिणींना दिले.
सर्वश्रेष्ठ विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेस मध्ये पदवी प्राप्त केल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.डॉ.एन.जी.एमेकर, उपप्राचार्य डॉ.आप्पाराव काळगापुरे, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.