बकरी ईद निमित्त इदगाह मैदानाची सफाई व जय जवान चौकातील नाली वर सी. सी. बेड टाकण्याची मागणी
उदगीर [ प्रतिनिधी ] : उदगीर शहरातील मुस्लिम बांधव ईद-उल-अजहा (बकरी ईद ) निमित्त ईदगाह मैदानावर नमाज आदा फार मोठ्या संख्येने करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ईदगाह मैदानावर चिखल होण्याची शक्यता असते , काही भागात पावसाचे पाणी साचले जाते. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदानाची साफ सफाई करून सिलकोट टाकण्यात यावे, तसेच मुस्लिम समाज बांधव कुर्बानी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे मुस्लिम बहुल भागात स्वच्छते करिता घंटा गाडी व नळाला पाणी सोडावे, तसेच ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जय जवान चौकातील नालीवरील बेड फुटला असून त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत. तरी तेथे बेड लवकरात लवकर टाकावा. अशी मागणी जन परिवर्तन मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शेख यांनी उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या एका निवेदना द्वारे केली आहे. या निवेदनावर मोहमद मुन्तजीब, हाशमी शोहेब, अजहर शेख, बागवान एयाज, शेख अ. रहीम, मकसुद बागवान, सय्यद असल, शेख इम्रान,शेख शेहबाज, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.