गोवंशाची बेकायदेशीर वाहतुक; आयशर टेम्पो पोलीसांनी पकडला

गोवंशाची बेकायदेशीर वाहतुक; आयशर टेम्पो पोलीसांनी पकडला

अहमदपूर (गोविंद काळे) : गोवंशाची बेधडकपणे वाहतूक करीत असल्याने पाच जणांविरोधात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी( ता.8 ) रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांना शहरातून लातूरकडे जाणाऱ्या या के. ए. 38. ए – 4738 या क्रमांकाच्या आयशर टेम्पो मध्ये बैल जातीची प्राणी निर्दयपणे कोंबून तो लातूरकडे जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी हा टेम्पो शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर नांदेडकडून लातूर कडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर धरला व चौकशी केली असताना त्यांना गंगाखेडकडून कर्नाटक बैल बाजारात विक्रीसाठी 14 बैल जातीचे प्राणी घेऊन जात असल्याचे कळले. यासंदर्भात अहमद शेख सुलतान शेख (26 वर्ष, रा. बारूळ, ता. भालकी ), पांडू मन्नू खेतायत ( 35 वर्ष, रा.नायक तांडा, अंध्र प्रदेश), सुधाकर व्यंकटराव झोले ( 48 वर्ष, रा.हंडरगुळी, ता.उदगीर), महमूद अली इस्माईल ( 72 वर्ष, रामनलो, ता.बिदर), मोइज, खाजा मैनुद्दीन कुरेशी ( 20 वर्ष, भोपणपीता जि.संगारेड्डी) यांच्यावर बेकायदेशीर पणे जनावरे टेम्पो कोचून भरणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, मुक्या प्राण्यांना त्रास देणे या संदर्भात गुन्हा नोंद झाला आहे. बैल जातीचे 14 प्राणी ज्याची अंदाजे किंमत सात लाख रुपये व वाहतुकीचा टेम्पो ज्याची किंमत चार लाख रुपये असा एकूण 11 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालावर कारवाई करण्यात आली. या संदर्भात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष डाॅ.गजानन माने, प्रशांत मुळे, बाळासाहेब जवळगेकर, गोविंद गुडमे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे मधुकर धडे, नरेश यादव, सुदर्शन पाटील, सुरज कापडे , मारुती भोसकर, नितेश सिंहाते गोविंद केशव भोसले व इतर गोरक्षक यांनी पोलीस प्रशासनास माहिती देण्यास सहकार्य केले.

About The Author