पु अहिल्यादेवी विद्यालयाचे आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

पु अहिल्यादेवी विद्यालयाचे आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फतघेण्यात आलेल्या आठवी स्कॉलरशिप (पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती) परीक्षेची 2023 ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेली असून या मध्ये श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडूरकी द्वारा संचालित पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक  विद्यालयाचे इयत्ता आठवी वर्गातील  ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.त्यामध्ये सुरनर तनुश्री प्रवीण, देवकते शिवानी नागनाथ, पिंपळे शिवलिंग दत्ता  हे ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे तथा मार्गदर्शक शिक्षकांचे  श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस तथा संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे पाटील, ॲड मानसी हाके,कोषाध्यक्ष अमरदीप हाके, संचालक सुरेंद्र चाकूरकर  यांच्यासह  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!