सांगवी येथे दोन तास चक्काजाम आंदोलन..!

सांगवी येथे दोन तास चक्काजाम आंदोलन..!

रस्ता ओलांडण्यासाठी पर्याय देण्याची गावकऱ्यांची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 सांगवी सुनेगाव या चौरस्त्यावर रस्ता ओलांडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा ही आग्रही मागणी घेवून सर्व गावकऱ्यांनी मिळून तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

मौजे सांगवी (सु.) हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361वर आहे तसेच येथूनच परभणी कडे जाणारा रस्ता असून या ठिकाणी वहातूकीचे मोठे जंक्शन निर्माण झाले आहे.या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने सांगवी सुनेगाव हे गाव वसले आहे.गावातील अंगनवाडी,शाळा,
माध्यमीक उच्चमाध्यमीक विद्यालय,मंदीर असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी लहान मुलांना आभालवृद्ध नागरिकांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे.तसेच शेतीसाठी बैलबारदाना रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने शेतकरी बांधव सूध्दा मोठ्या अडचणीत सापडला आहे.भरधाव वाहनांमुळे अक्षरशः जीव मुठीत घेवून नागरीकांना वावरावे लागत आहे.तसेच दररोज छोटे-मोठे अपघातही होत आहेत.त्यामुळे येथील नागरिकांच्या सोयी करता पर्याय उपलब्ध करून द्यावा,तसेच सुनेगांव येथे सर्व्हिस रोड मंजेर करावा आणी येथे बसथांबा तयार करावा आदी प्रमुख मागणीसाठी गावातील सर्व नागरिकांच्या वतीने या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 361 वर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र सरचिटणीस प्राचार्या रेखा तरडे हाके-पाटील, तसेच युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, ग्रा.पं.सांगवीचे सरपंच राजेश कांबळे, ग्रा.पं. सदस्य आकाश सांगवीकर,नरसिंग कोंडेवाड आदींनी याचे नेतृत्व केले.याप्रसंगी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली.या अंदोलनास शिवसेना (ऊबाठा)जिल्हाप्रमुख बालू रेड्डी यांनी सूध्दा भेट दिली.

सदरील रास्ता रोको आंदोलनासाठी दोन्ही शाळेतील विद्यार्थी, गावातील महिला,युवक, आबालवृध्दांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रास्ता रोको यशस्वी करण्यासाठी गजेंद्र कांबळे,शरद कांबळे, पापा देवकत्ते,निसार शेख,संदीप कांबळे,राजू सूरनर,अप्पाराव सूरनर,सूनिल कांबळे,रमाकांत कांबळे,नामदेव सूरनर महाराज,असद शेख,लक्ष्मणराव वाघमारे,संतोष राठोड,संतोष चव्हाण,मूस्तफा सय्यद,फेरोज शेख,बाबुलाल शेख,नंदू वाडकर,भगवान दुर्गे उत्तम सांगवीकर आदींनी पुढाकार घेतला.

याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About The Author