शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे वळावे- गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे
अहमदपूर ( गोविंद काळे ) शरीरासाठी जसे अन्न महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे बुद्धीला वाचन आणि श्रवण महत्त्वाचे असून बाल वयातच विद्यार्थ्यांचा पाया पक्का व्हावा म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेचा चिकित्सकपणे अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे असे जाहीर आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी केले. ते संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, श्रीराम आरदवाड,रफिक शेख, प्रताप पाटील, गजानन डूब्बेवार, लक्ष्मण फुलारी, ज्ञानेश्वर चव्हाण, अर्चना येरबले, मुख्याध्यापक आशा रोडगे, उद्धव शृंगारे सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा मानाचा फेटा, स्मृतिचिन्ह व पुष्पहार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामध्ये
आर्यन आरदवाड 236 गुण घेऊन जिल्ह्यात अकरावा तर विद्यालयातून प्रथम आला आहे.अमृता येरबले,सृष्टी सूर्यवंशी,नोमान शेख,श्रेया जवणे,आदर्श चोबळे, सार्थक उगिले ,अजिंक्य पाटील ,श्रेया पवार ,स्वराज मोरे , संतोषी कंदे ,रुद्र चव्हाण ,अनुश्री डुब्बेवार ,सोहम फुलारी ,
अंश हल्लाळे, हे तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना शारदा तिरुके, सविता पाटील, सतीश साबणे, त्रिगुणा मोरगे, सोनिका पवार यांनी मार्गदर्शन केले.
या नेत्रदीपक यशाबद्दल श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, सचिव प्राचार्या रेखाताई तरडे पाटील, समन्वयक कुलदीप भैय्या हाके यांनी अभिनंदन व कौतुक केले. यावेळी माता पालक कविता जवणे, कल्पना उगिले, गायत्री कंदे, महानंदा मोरे, नमिता पवार, शिवनंदा चोबळे, मनीषा फुलारी, आशा हल्लाळे,सुशीला ब्यागलवार, स्वाती डुब्बेवार या गुणवंत विद्यार्थ्यांच्या माता पालकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार शारदा तिरुके यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.