ना.बनसोडे उदगीरचा कायापालट करतील – सुदर्शन मुंडे

ना.बनसोडे उदगीरचा कायापालट करतील - सुदर्शन मुंडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सद्यस्थितीत विकास गतिमान आहे, आता उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात विकास होईल. असा विश्वास उदगीर दाल मिल असोसिएशनचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन मुंडे यांनी व्यक्त केला.

ते नामदार संजय बनसोडे हे उदगीर येथे नागरी सत्कारा निमित्त आले असता, विश्रामगृहावर त्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी संदीप शिवाजीराव हुडे, कल्पेश बाहेती, माऊली पंदीलवार, आदिनाथ कोरे, आतिश बियाणी, संजय नावंदर, सुरेश बोडके, संजय दळवे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना सुदर्शन मुंडे यांनी स्पष्ट केले की, ना. संजय बनसोडे हे राज्यमंत्री असताना आभाळाला गवसणी घालण्याचे काम केले आहे. गेल्या पन्नास वर्षातील विकासाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे. आता कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उदगीरला नवीन नवीन उद्योगधंदे उभा करण्यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न करतील, शेतीमालावरच्या प्रक्रियेसाठीही निश्चितपणे नवे नवे प्रकल्प उदगीर भागात येतील याची खात्रीही त्यांनी दिली. विकासाची दृष्टी आणि मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, ही तळमळ संजय भाऊ बनसोडे यांच्याकडे असल्यामुळे ते निश्चितपणे गतिमान विकास करतील,असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सुरेश बोडके यांनी केले.

About The Author