ना. संजय बनसोडे यांचा उत्साहाच्या वातावरणात भव्य दिव्य नागरी सत्कार

ना. संजय बनसोडे यांचा उत्साहाच्या वातावरणात भव्य दिव्य नागरी सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना. संजय भाऊ बनसोडे यांचा उदगीर शहरात आणि लातूरहून उदगीरला येत असताना मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ढोल, ताशाच्या गजरात, फुलांची उधळण करून, फटाक्यांच्या आतिषबाजी सह, कुठे पेढे तुला तर कुठे लाडू तुला करून आपल्या लाडक्या नेत्याचे औक्षण करून दीर्घायुष्याची प्रार्थना केली गेली.

उदगीर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या नागरी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहीनिनाथ महाराज औसेकर, ह भ प एकनाथ महाराज लोमटे मलकापूरकर, आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. गोविंदराव केंद्रे, शरदचंद्रजी पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशनचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापूरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अफसर बाबा शेख, भंते नागसेन बोधी, सुधीर भोसले, देविदास कांबळे, सुदर्शन मुंडे,मनमथआप्पा किडे, प्रा. प्रवीण भोळे, शेख समीर, शाम डावळे, रामराव राठोड, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, चंद्रशेखर पाटील आतनुरकर, उदयसिंह ठाकूर, मंजूर खा पठाण, अभिजीत औटे, कुणाल बागबंदे, बाळासाहेब मरलापल्ले, इब्राहिम देवर्जनकर, इत्यादी मान्यवरासह सत्कारमूर्ती ना. संजय भाऊ बनसोडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शिल्पाताई बनसोडे, बंधू अनिल बनसोडे आणि सर्व कुटुंबीय या देखण्या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

ना. संजय बनसोडे यांचा उत्साहाच्या वातावरणात भव्य दिव्य नागरी सत्कार

उदगीर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्री मिळाल्यामुळे ना. संजय बनसोडे यांच्या जंगी सत्काराची तयारी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी उत्साहात केली होती. उदगीर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करताच डीग्रस, करडखेड, लोहारा, मलकापूर, तीवटग्याळ या गावात देखील जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. उदगीर शहरात प्रवेश करताच सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या वतीने उषा टॉकीज समोर भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जिल्हा परिषद मैदानावरील कार्यक्रमाला पाहुणे उपस्थित राहिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण भोळे, श्याम डावळे यांनी केले. याप्रसंगी विधानसभा मतदारसंघातील विविध संघटना, विविध पक्ष कार्यकर्ते, सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्याही वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आ. बाबासाहेब पाटील, ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, एकनाथ महाराज लोमटे, सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, अफसर बाबा शेख, रामचंद्र तिरुके आदींची सविस्तर भाषणे झाली.

सत्काराला उत्तर देताना ना.संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, मला सतत विचारले जाते आहे. तुमच्या बॅनर वर, पोस्टरवर पवार साहेबांचा फोटो का? त्या सर्वांना मी हे सांगू इच्छितो की पवार साहेब केवळ पोस्टर आणि बॅनर वरच नाही तर आमच्या हृदयात आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही राजकारणात पुढे जात आहोत. कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने बोलताना ना. संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार हीच माझ्या कामासाठी ऊर्जा असून त्यांच्याच आशीर्वादाने मी मतदार संघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे, करणार आहे, करत राहीन, ही मिळालेली संधी कायम जनतेसाठी राबविन. मराठवाड्याला स्व. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विकासात्मक दृष्टीचा वारसा आहे. तो वारसा चालू ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आपल्या मतदारसंघाचा कायापालट करत असतानाच मतदारसंघातील युवकांना, बेरोजगार तरुणांना उद्योगधंदे उभारता यावेत. यासाठी औद्योगिक वसाहतीचे प्रयत्न चालू आहेत, ते पूर्ण करू. हरितक्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी तिरू प्रकल्पावरील बॅरेजची उंची वाढवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून 15 ऑगस्ट पर्यंत त्याचा लोकार्पण सोहळा पूर्ण करू. असे आश्वासनही याप्रसंगी दिले.

केंद्र व राज्यातील विविध योजना आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, एम्स सारखी एखादी संस्था या भागात उभारण्याचाही आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता येलमटे व रसूल पठाण, पद्माकर उगिले यांनी केले. या नागरी सत्कारासाठी मतदार संघातील हजारो नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.

About The Author