महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सुनिता ककुर्ले यांचा सत्कार

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सुनिता ककुर्ले यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सुनीता सूर्यकांतराव ककूर्ले यांची निवड झाल्याबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर पर्यवेक्षक प्रा. जे.आर.कांदे, प्रा.पी.वाय. जालनापुरकर, प्रा.एस.बी.येडले, प्रा.एम.डी.समगर, प्रा.अमोल बिराजदार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना ककूर्ले यांनी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातच आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली असे सांगून दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेमध्ये यश येऊ शकते असे सांगितले. अकरावीच्या वर्गातच विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात काय व्हायचे आहे याची ध्येय निश्चिती करावी. सूत्रसंचालन प्रा.जे.आर.कांदे यांनी केले तर आभार प्रा.प्रवीण जाहुरे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!