रिपब्लिकन सेनेच्या वतीने पेट्रोल, डिझेल, रसोई गॅस महागाई विरोधात देवणी तहसिलदार यांना निवेदन दिले

रिपब्लिकन सेनेच्या वतीने पेट्रोल, डिझेल, रसोई गॅस महागाई विरोधात देवणी तहसिलदार यांना निवेदन दिले

देवणी (प्रतिनिधी) : रोजी पेट्रोल, डिझेल, रसोई गॅस दरवाढ कमी करण्यातबाबत रिपब्लिन सेनेचे लातुर (द) जिल्हाध्यक्ष प्रा.नरसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने देवणी तहसिलचे नायब तहसिलदार विलास तरंगे यांना भाववाढ कमि करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब याच्या आदेशाने निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरनामुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे दर वाढून आभाळाला टेकलेले आहेत, त्याची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार तर्फे पेट्रोल, डिझेल, रसोई गॅस मध्ये अमाप दरवाढ करण्यात येत आहे,त्यामुळे ट्रान्सपोर्ट भाड्यामध्ये वाढ झाली असून दररोज दैनंदिन जीवनात येणाऱ्या वस्तू महागल्या गेल्या आहेत आणि या सर्व कारणामुळे देशातील आणि राज्यातील जनतेचं कंबरड मोडले गेले आहे, एकीकडे महागाई तसेच कोरोना संकटाने देशातील जनता त्रस्त आहे आणि आपण नवीन प्रधानमंत्री आवास आणि ससंद भवन बांधन्याकरिता अरबो-खरबो रुपये खर्च करीत आहात महोदय देशात सध्या या आवासाची आणि भवन ची गरज नसून देशातील जनतेचे प्राण वाचवणे महत्वाचे आहेत. म्हणून आपणास आम्ही या निवेदना मार्फत विंनती करीत आहोत कि आपण पेट्रोल, डिझेल आणि रसोई गॅसचे दर कमी करावेत जेणेकरून तसेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या वस्तूंचे भाव कमी होऊन जनतेला थोडा तरी दिलासा केंद्रसरकार कडून मिळेल. या मागनिचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष नरसिंग सुर्यवंशी, लक्षमण रणदिवे, दिलीप शिंदे, गारिधर गायकवाड, अक्षय शिंदे, मधुकर काबंळे, अंगद गायकवाड यांच्या सह्या आहेत.

About The Author