अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडला- प्रा. राहुल पुंडगे
उदगीर(एल.पी.उगीले):- अण्णाभाऊ साठे एक थोर समासुधारक होते. त्यांनी समाज जागृती करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अत्यंत गरीब आणि हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही, फक्त दीड दिवस शाळा शिकुन जगात अण्णाभाऊ यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली आहे. त्यांचे लेखन हे येथील उपेक्षित, दलीत, कष्टकरी, कामगार यांचे प्रतिनिधित्व करणारे होते. त्यामुळे अण्णाभाऊ चे लेखन या समाजातील तळागळातील लोकाचा आवाज आहे. असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्फत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा. राहुल पुंडगे बोलत होते.
पुढे बोलताना प्रा. पुंडगे असे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्यावर छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचाराचा प्रभाव होता. त्यांनी विपुल लेखन केले आहे. आजच्या तरुणाईनी अण्णाभाऊ यांना वाचले पाहिजे, त्यांचे विचार अंगीकृत केले पाहिजे. असे ही ते म्हणाले. यावेळी मंचावर स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य गणेश तोलसरवाड, प्रा. अमर तांदळे, डॉ. धनजय गौंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शेषनारायण जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भारतीय स्वांत्र्य लढ्यात लोकमान्य टिळक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी स्वराज्याच्या स्थापने साठी समाजात जाणीव जागृती केली. त्यांनी शिवजयंती, गणेश उत्सव साजरे करण्याची सुरुवात केली.इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारले यासाठी त्यांना सहा वर्ष कारावासाची शिक्षा देखील झाली. असे ते म्हणाले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.रशिद दायमी, प्रा. आकाश कांबळे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. संजीवनी भालेराव, प्रा.हनमंत सूर्यवंशी, प्रा. ऋतुजा दिग्रसकर,प्रा. राखी शिंदे, प्रा. असिफ दायमी, प्रा. नावेद मणियार, प्रा. आवेज शेख, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. त्वरिता मिटकरी, उषा गायकवाड,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, अमोल मसुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. अमर तांदळे तर आभार प्रा. आकाश कांबळे यांनी मानले.