देवणी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

देवणी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : देवणी येथील लोकजागृती शिक्षण संस्थेचे सचिव, भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
भाऊसाहेब सहकारी बँक व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात २२४ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात येऊन १२२ जणांवर
नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच लोकजागृती शिक्षण संस्थेतील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. रामप्रसाद लखोटिया, प्रशांत पाटील जवळगेकर, दिलीप मजगे देवणीकर, सदाशिव पाटील
तळेगावकर, डॉ. एल.एम. कुलकर्णी, वसंतराव सोनकांबळे, अण्णाराव पाटील, नामदेवराव पाटील, व्यंकटराव काळे, शंकरराव पाटील तळेगावकर,
प्रा. किशनराव हरमुंजे, उत्तरा कलबुर्गे, मनोज पुदाले, सुधाकर मांगुळकर, ॲड. दत्ताजी पाटील, बाबुराव बिरादार, शांतीनाथ ढगे, व्यंकटराव पाटील अवलकोंडेकर, कोमल बिरादार, नागोराव भोसले, गोपीनाथ सगर, दिनेश पाटील,ईश्वर खटके, संभाजी पाटील तळेगावकर, रविंद्र हसरगुंडे, विजयकुमार पारसेवार, बाबुराव इंगोले, रामराव राठोड, डॉ. शंकरप्पा मजगे, काशिनाथ गरिबे, मनोहर पटणे, अशोक लुल्ले, रमेश कोतवाल,बशीर पठाण, व्यंकटराव पाटील लासोनकर, मल्लिकार्जुन डोंगरे यांच्यासह डी.व्ही. राजे, प्राचार्य एम.बी. मांजीबाळे, बी.व्ही. पाटील डिग्गीकर, मुख्याध्यापक तानाजी पाटील तळेगावकर, आर.के. बिरादार, विनायक पाटील, दत्ता अचवलकर, प्रा. सलीम मुंजेवार, नंदकुमार पटवारी, सुधीर नाबदे, डी.एन. कांबळे, मच्छिंद्रनाथ दारनुळे, शिवाजीराव पाटील, सुमंत बिरादार, बी.एल. पाटील, सरपंच सतीश पाटे, चेअरमन अविनाश पाटील, अनिल निडवंचे तळेगावकर तसेच बँकेचे अधिकारी एस. एस. पाटील, शिवाजी पाटील तळेगावकर, सर्व शाखाधिकारी यांची उपस्थिती
होती.

About The Author