रेणापूर येथील बालाजी मंदिर सभागृहासाठी १ कोटीचा निधी; आ. कराड यांचे आभार व्यक्त

रेणापूर येथील बालाजी मंदिर सभागृहासाठी १ कोटीचा निधी; आ. कराड यांचे आभार व्यक्त

लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर येथील श्री. बालाजी मंदिर परिसरात सभागृह बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचा श्रीबालाजी मंदिर ट्रस्ट आणि भाजपाच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी आ. रमेशआप्पा कराड यांनी आजपर्यंत वेळोवेळी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी मंजूर करून पाणीपुरवठा योजना, मोठ्या प्रमाणात घरकुल, विविध प्रभागात सिमेंट रस्ते आणि नाली बांधकाम, रेणा नदीवर घाट बांधकाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अग्निशमन वाहन आणि इमारत, शादीखाना यासह विविध विकास कामांना गती दिली. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणापूर येथिल श्री. बालाजी मंदिर परिसरात भव्य दिव्य सभागृहाचे बांधकाम व्हावे आणि भाविकांची सोय व्हावी यासाठी आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला. त्याबद्दल श्री बालाजी मंदिर ट्रस्टच्या आणि भाजपा लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या वतीने यथोचित सत्कार करून जाहीर आभार व्यक्त केले.

पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावे मी सहकार्य करण्यास कठिबद्ध आहे असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, बालाजी मंदिर सभागृहाचे बांधकाम अत्यंत चांगल्या पद्धतीचे दर्जेदार व्हावे गरज पडली तर निश्चितपणे आणखीन निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे युवराज पाटील, लक्ष्मण कातळे, सुधीर खणके, बाळासाहेब पाटील, मधुकर कातळे, भागवत पाटील, रमाकांत कोळी, राजू शिंदे, यांच्यासह भाजपाचे दत्ता सरवदे चंद्रकांत कातळे, दिनकर राठोड, राजकुमार आलापुरे, शेख अजीम, हनुमंत भालेराव, अच्युत कातळे, उत्तम चव्हाण, गणेश माळेगावकर, केशव पिशवे, योगेश राठोड, रफिक शिकलकर, सुभाष राठोड, सागर हाके, उमेश नरवटे, जयदीप बोडके, श्रीनिवास हाके यांच्यासह अनेक जण होते.

About The Author