परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे केले स्वागत

परळी वैजनाथ ( गोविंद काळे ) : परळी केंद्र आशिया खंडातील नंबर 1 चे केंद्र म्हणून ओळखले जाते परळीच्या या पावन भूमीत वैद्यनाथांच्या या नगरीत परळी औष्णिक विद्युत केंद्र हे मानाचा तुरा म्हणून ओळखला जातो या औष्णिक विद्युत केंद्रातून महाराष्ट्राची विजेची भूक भागवून या करिता अहोरात्र परिश्रम घेऊन निर्मिती या केंद्रातून केली जाते अनेक उच्चांक प्रस्थापित केलेले आहे याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी परळी केंद्राला नुकतीच भेट देऊन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संघटना व कर्मचारी अभियंता अधिकारी यांचे अभिनंदन केले संच क्रमांक 6,7, 8 या तिन्ही संचातून जानेवारी ते मे दरम्यान या तिने संचातून क्षमतेपेक्षा अधिक वीजनिर्मिती करून उच्चांक प्रस्थापित केला आहे याची दखल मुख्य कार्यालय सुद्धा घेऊन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगली वाटचाल परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मिती करून दाखवली आहे आहे त्याचबरोबर परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा वाढदिवस दिनांक 12 6 2021 रोजी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या उपस्थितीत हा दुग्धशर्करा योगायोग घडून आल्याने मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आ.संजय दौंड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी हे उपस्थित होते. त्याच बरोबर या प्रसंगी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना शुभेच्छा देऊन परळी केंद्राची जबाबदारी व परळी केंद्राचा नावलौकिक करण्याकरिता पुढील वाटचालीस सस्नेह शुभेच्छा दिल्या. ऊर्जा मंत्री यांनी परळी केंद्र सतत चालू राहण्याकरिता जी काही मदत लागेल ती मदत करून परळी केंद्र अविरत वीज निर्मिती करेल अशी आशा व्यक्त संघटना प्रतिनिधी यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राला स्वस्तात स्वस्त कोळसा मिळावा ट्रान्सपोर्ट खर्चा मध्ये सुट देण्यात यावी जेणेकरून कमीत कमी दरात परळी केंद्रातून वीजनिर्मिती होईल अशा प्रकारची निवेदन देऊन मागणी केली त्याबाबतही ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक भूमिका दाखवून वीजनिर्मिती कमीत कमी दरात करण्याकरिता हवी ती मदत दिली जाईल अशा प्रकारचे आश्वासित केले. याप्रसंगी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सन्माननीय मोहन आव्हाड व सर्व अधीक्षक अभियंता ,अवचार, इंगळे ,राठोड ,नरवाड ,होळंबे सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व संघटना प्रतिनिधी सुधीर मुंडे ,डी एन देवकते ,हरिभाऊ गीते, वैजनाथ चाटे ,अरुण गीते व सहाय्यक कल्याण अधिकारी प्रभारी अविनाश जाधव त्याच बरोबर सर्व कर्मचारी अभियंता यांनी सर्वांन ऊर्जामंत्री यांचे आभार व्यक्त केले. तसेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे परभणी कडे रवाना झाले.

About The Author