विद्युत महामंडळाच्या थ्री फेज लाईनच्या तारा तुटून बाप लेकाचा मृत्यू

विद्युत महामंडळाच्या थ्री फेज लाईनच्या तारा तुटून बाप लेकाचा मृत्यू

उदगीर ( एल.पी.उगीले ) : उदगीर तालुक्यातील मौजे बामणी येथे शनिवारी दुपारी वादळी वारा आणि जबरदस्त पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. गोरगरिबांच्या घरावरचे छप्पर उडून गेले. याच दरम्यान बामणी येथील शेतकरी नारायण कोंडमंगले अंदाजे वय 45 वर्ष व त्यांचा मुलगा रामेश्वर कोंडमंगले वय 15 वर्ष हे आपल्या शेतातील काम आटोपून व पावसाचा अंदाज वाटल्यामुळे घराकडे लुना वरून  परत येत होते. दरम्यान रस्त्याच्या कडेलाच त्यांच्या अंगावर महावितरणची लाईटची थ्री फेज वायर तुटून पडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

 याच दरम्यानच्या काळात नैसर्गिक वातावरण बिघडल्यामुळे धोंडीबा माधवराव बामणे या शेतकऱ्याला इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून हात जळाला आहे. त्याला उदगीर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एक वर्षापूर्वी देखील रामकिशन मेहेत्रे यांची पंधरा वर्षाची मुलगी विद्युत अधिभार वाढल्यामुळे विजेचा धक्का लागून ठार झाली झाली होती.

 यादरम्यान बामणी गावातील लोकांना या विद्युत महामंडळाच्या कामाबद्दल प्रचंड चीड आहे, गावातील बहुतांश लाईटचे पोल हे वाकलेले आहेत. व विद्युत प्रवाह चालू असताना अनेक घरावरून या जिवंत तारा लोंबकळत आहेत. यामुळे पुन्हा अशा घटना घडू शकतात. याचे गांभीर्य विचारात घेऊन महावितरण कर्मचारी यांना यासंदर्भात पाबंद घालायच्या सूचना करून देखील कोणीही दखल घेतली नसल्यामुळे आज दुर्दैवाने बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण बामणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 चौकट ……

यादरम्यान उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, सदरील घटनेच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाच्या वतीने संगीता माटरोल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या दुर्घटनेत मयत पावलेल्या दोन्ही व्यक्तीं च्या वारसांना महावितरण कडून प्रत्येकी चार लाख रुपये प्रमाणे मदत मिळू शकेल. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तातडीच्या कामकाजासाठी सोमवारी वीस हजार रुपये प्रत्येकी या प्रमाणे मदत दिली जाणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने रामेश्वर गोरे यांनी दिली आहे.

 आमच्या प्रतिनिधीने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!