जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, शेतकरी,पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित रहावे – प्रा.विवेक सुकने
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठा सेवा संघ व जिजाऊ प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने 13 ऑगस्ट 2023 रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता जिल्हास्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कार व तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते येथील ललित भवन मंगल कार्यालय , नळेगाव रोड , उदगीर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विवेक सुकने राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे , तहसीलदार रामेश्वर गोरे, मुंबई मनपाचे कार्यकारी अभियंता विठ्ठलराव जाधव ,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रोहन जाधव ,माधवराव हलगरे,संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष जितेंद्र मादलापूरकर राहणार आहेत ,स्वागत अध्यक्ष म्हणून मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर,उद्योजक बिपीन पाटील राहणार आहेत .
मराठा सेवा संघ व जिजाऊ प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.शिक्षकांना, शेतकऱ्यांना व पत्रकारांना समाज उपयोगी काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमात जिल्ह्यातील पन्नास शिक्षक, पंचवीस शेतकरी व वीस पत्रकार बांधवाचा सत्कार करण्यात येणार असल्याचे प्रा.विवेक सुकने यांनी सांगितले. व सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रदिप ढगे,सचीव राजकुमार कानवटे,प्रा.भास्कर मोरे,कालीदास बिरादार,संदीप जाधव,भरत पुंड ,प्रा.संभाजी जाधव , ज्ञानेश्वर नकुरे, अंकुश हुंडेकर, डॉ.विजयकुमार मोरे,दिपक मिरजकर , रामेश्वर बिरादार,हाणमंत लोभाजी ,अनिताताई जाधव, पुष्पाताई जाधव,अनिता जगताप,वंदना भोसले, कमलाकर मुळे, डॉ.निवृत्ती तिरकंमटे, अंगद पाटील ,गणपत गादगे आदी उपस्थित होते.