यशवंत विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, प्रमुख अतिथी टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी हे होते.यावेळी प्रा.एम.यू. सय्यद, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, निर्मला पंचगल्ले, राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी, खयूम शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने
शाळेत विविध स्पर्धेतील गुणवंताचा सत्कार संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते सन्मानपत्र पारितोषिक देऊन करण्यात आला.
यावेळी 15 ऑगस्ट निमित्ताने संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ, अरुण मोरे यांनी स्काऊट गाईडची, अशोक पेद्येवाड यांनी एन सी सी च्या विद्यार्थ्यांना शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील आणि कपिल बिराजदार यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!