महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्याण प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंच प्रण शपथ, मेरी माटी ; मेरा देश, हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयात दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्य दिन समारोह कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांनी केले तर ; आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.