भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनी 75 माजी सैनिकाचां सत्कार.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनी 75 माजी सैनिकाचां सत्कार.

अहमदपूर ( गोविंद काळे ) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त देश सेवा करुन सेवानिवृत्त झालेल्या तालुक्यातील 75 सैनिकांचा स्वातंत्र्य दिनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
शहरातील लातूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील अॅड. अमित रेड्डी यांच्या निवासस्थानी 76 व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त सेवा निवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर यांच्या हस्ते सकाळी 8-15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या 75 माजी सैनिकाचां सत्कार करून,विरपत्नी सुलोचना जायभाये यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी माजी सभापती अॅड. आर. डी. शेळके, हरिभाऊ येरमे,बाबुराव बावचकर,अॅड.अमित रेड्डी, शंकर अप्पा भालके, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, यतिराज केंद्रे, डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, बाबुराव पाटील, नागेश भुतडा , श्रीकांत भुतडा, रामभाऊ बेल्लाळे,राजकुमार खंदाडे,राहुल शिवपुजे,निखील कासनाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास शेटे,बालाजी बोबडे, पांडुरंग गलाले,विजय पाटील, राजू रेड्डी, सोमनाथ पुणे, मतिन जागीरदार,तुकाराम सांगविकर,अन्वर पठाण,प्रशांत जाभाडे,अतुल रेड्डी,सचिन नागरगोजे,संगम कुमदळे,जयश्री केंद्रे, गंगाधर गायकवाड,उत्तम राठोड,यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सेवा निवृत्त सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author