तब्बल 1111 फूट लांब तिरंगा ध्वज रॅलीने शहर दूमदूमले..!

तब्बल 1111 फूट लांब तिरंगा ध्वज रॅलीने शहर दूमदूमले..!

अहमदपूर ( गोविंद काळे )
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सम्राट मित्र मंडळ व नगर परिषद आणी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 1111 फूट लांबीच्या शौर्य व त्यागाचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वज प्रतिकृती तिरंगा रॅलीने अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.या रॅलीने व देशभक्तीच्या जयघोषाने अहमदपूर शहर अक्षरशः दुमदुमले.

रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार बब्रूवान खंदाडे होते तर माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते फित कापून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,प्रवक्ते गणेशदादा हाक्के, अशोकराव केंद्रे,अँड.भारत चामे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, उपजिल्हाधिकारी प्रविण फूलारी,तहसिलदार शिवाजी पालेपाड, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,विचार विकास मंडळाचे सचिव अँड.पी.डी.कदम,
प्राचार्या डाॅ.अनिता शिंदे,शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मणराव अलगूले,अँड.
अमितभैय्या रेड्डी, अँड.निखील कासनाळे,उपप्राचार्य पी.बी.बाभूळगांवकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या तिरंगा रॅली साठी लातूर जिल्हा पोलीस यांचे पोलीस बँड पथक यांच्या मधूर राष्ट्रगीतांच्या विविध गीताने रॅलीस सुरुवात झाली.

रॅलीची सुरुवात महात्मा गांधी महाविद्यालय येथून होवून छत्रपती महाराज चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, शहीद गौतम वाघमारे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सावरकर चौक या मार्गे येवून छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे राष्ट्रगीतांने रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी या तिरंगा ध्वजावर जागोजागी पुष्प वर्षाव करत या तिरंगा रॅलीचे स्वागत केले. भारत माता की जय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिरायू होवो, जय हिंद अशा राष्ट्र प्रेरक घोषणेने संपूर्ण अहमदपूर शहर दुमदुमून गेले.
एकूणच या तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम केले.हा अमृत महोत्सव जन भागीदारी आणि जन आंदोलन’ च्या भावनेने साजरा केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व अहमदपूरकरांनी कधी नव्हे ते मुख्य रस्त्यावरील महाकाय अशा तिरंगा ध्वजाची प्रतिकृती पाहीली हे विशेष.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा संयोजक युवकनेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद गिरी,अॅड . सुभाषराव सोनकांबळे,माजी नगरसेवक गफार पठाण,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, आकाश सांगवीकर, प्रा. मारोती बुद्रुक पाटील, प्रा, संकेत चापोलीकर, पत्रकार अजय भालेराव, पत्रकार भिमराव कांबळे,सचिन बानाटे, बालाजी मस्के, गणेश मुंडे,शरद सोनकांबळे, संजय भालेराव,प्रदीप कांबळे, शिवाजीराव भालेराव, कैलास सोनकांबळे, प्रकाश लांडगे, भैय्यासाहेब भालेराव, राहुल सूर्यवंशी, प्रभाकर कांबळे, आकाश सांगवीकर, आकाश पवार, आदित्य भालेराव, माणिक वाघमारे,रमेश कांबळे, संभाजी कांबळे, शरद कांबळे, मतीन शेख, दिलीप भालेराव, तबरेज सय्यद,महमद पठाण, नौसाद सय्यद, हर्षवर्धन हावरगेकर, नुरमहमद शेख ,मतीन शेख,जंगले सतीश, आकाश पवार आदींनी पुढाकार घेतला.

शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामूहिक राष्ट्रगीत गाऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. विशेषतः एन. सी. सी. एन. एस.एस तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे युवक युवती सहभागी झाले होते. विविध शाळा शाळांचे विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक, नगरपरिषद कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डोळ्याचे पारणे फिटावेत राष्ट्राच्या प्रती उर भरून यावा असा देखणा अमृत महोत्सवी सोहळा अहमदपूरकरांनी पाहिला.
येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या समोरून या तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली

क्षणचित्र:-
या तिरंगा रॅलीत एन.सी.सी./एन.एस.एस/स्काॅऊट गाईड प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच ज्ञानदीप भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षणार्थी, तसेच साई गणेश मिल्ट्री अकॅडमी चे प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला. किलबिल नॅशलन स्कूल च्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या प्रतिकात्मक देखावे निर्माण करून या रॅलीत सर्वांचे लक्ष्य वेधले
•रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रयविर . दा. सावरकर, सुभाषचंद्र भोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. महापुरुषांचे फोटो असलेले फलक होते तसंच स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो होते. •विद्यार्थ्याच्या हातात तिरंगा ध्वज होते.

About The Author