मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. बाबासाहेब पाटील

मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन जनतेच्या अडचणी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी मांडले.
सोमवार १४ जून रोजी शहरातील ईदगाह मैदान संरक्षण भिंतीचे बांधकाम व सुशोभिकरणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे अध्यक्षस्थानी तर शिवानंद हेंगणे, सांबअप्पा महाजन, गटनेते मंचकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, मिनाक्षी शिंगडे, शिवाजीराव देशमुख, ॲड.हेमंत पाटील, सिराजोद्दीन जहागीरदार, अभय मिरकले, मौलाना युसूफ (नाजीम साब), मुफ्ती फाजील साब, हाफीज खुर्शीद साब, मौलाना फजले करीम साब, सलीम सय्यद ,अमीरसाब, जहुरोद्दीन काजी, मोहसीन बायजीद, मुजीब पटेल, काजी रियाजोद्दीन सिद्दीकी, आजीज काझी, अन्वर पटेल, अजहर बागवान, करीम गुळवे, निवृत्ती कांबळे, शिवाजी खांडेकर, अभियंता प्रकाश मोरे, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, इलियास सय्यद यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले की मतदार संघातील जास्तीत जास्त शेत शिवार सिंचनाखाली आणण्यासाठी मन्याड नदीवरील कोल्हापुरी बांधा-याचे रूपांतर बॅरेजेस मधे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.शहराच्या विकासासोबतच ग्रामीण भागातील विकासाकडे लक्ष देणार आहे.शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासाठी भरीव काम करावयाचे आहे.तालुक्यात शासकीय निधीतून होणारे सर्व कामं दर्जेदार कशी होतील या कडे लक्ष असून ते कामं वेळेत व दर्जेदार करावीत अशी सुचना प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदारांना आमदारांनी केली.
ईदगाह मैदानावरील संरक्षण भिंत व सुशोभिकरणाची मागणी मुस्लिम समाज बांधवाची मागील बावीस वर्षापासून होती, ती मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून पुर्ण झाली असून या कामासाठी एक कोटी १० लाख रुपयांचे कार्यारंभ आदेश तर ९० लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

         या वेळी लक्ष्मीकांत कासनाळे, प्रशांत भोसले, दयानंद पाटील, बालासाहेब पाटील, शेखर चौधरी, ॲड.भारतभूषण क्षीरसागर, विलास पवार, उत्तम माने, तानाजी राजे, जावेद बागवान, डॉ. फुजैल जहागीरदार, ताजोद्दीन सय्यद, रवी महाजन, फेरोज शेख, अय्याज शेख, फेरोज सय्यद, जमील मौलासाब, बाबूभाई रुईकर, भैय्याभाई सरवर लाल, सुभाष मुंडे, दिलदार शेख, पापा अय्या, डॉ.सिद्धार्थ कूमार सुर्यवंशी, इमरोज पटवेगर, हुसेन मणियार, एजाज शेख, अनिस कुरेशी, वसंत शेटकार, सतिष नवटक्के, बालाजी आगलावे, सचिन पडीले, राहुल शिवपूजे, सुनील डावरे, ससाणे प्रकाश यांची उपस्थिती होती.

About The Author