मुलींच्या शिक्षणासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सुनील केंद्रे यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील कुमठा (खू) उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थिनींना उदगीरला ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था नव्हती. गावातील 35 ते 40 मुलींनी राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सुनीलभाऊ केंद्रे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाने मुलींना शिक्षणासाठी बस मोफत केलेली आहे, रोज उदगीरला ऑटोने ये जा करण्यासाठी 60 रुपये तिकीट लागते. आम्हाला आपण बस चालू करून आमच्या पुढील शिक्षणासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. लगेच सुनीलभाऊ केंद्रे यांनी आगारप्रमुखाशी बोलून ग्रामपंचायतीचा ठराव देऊन बस व्यवस्था चालू केली. यामुळे गावातील मूली शिकल्या पाहिजेत, म्हणून सतत पाठपुरावा करून बस चालू करून दिल्याबद्दल सर्व मुलींनी सुनीलभाऊ केंद्रे व गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर जीवनराव पाटील यांचा सत्कार करून आभार मानले. या वेळी मी तुमच्या पाठीशी कायम आहे, असा शब्द सुनील केंद्र यांनी दिला.
यावेळी निकिता परमेश्वर कारभारी, हर्षदा माधव बिरादार,पूनम बालाजी जाधव,वैष्णवी भारत जाधव,हलीमा पाशा सय्यद,प्रियंका सूर्यकांत जाधव, श्रुती शिवराज जाधव, सुप्रिया पुंडलिक तलवारे ,समीक्षा दयानंद रणक्षेत्रे ,उषा पंढरीनाथ डिगोळे,सय्यद नसरीन चांदपाशा, तेलंग पूनम माधव, डिगोळे सखु दत्तू ,सुरवसे अंबिका माधव, आयनीले श्वेता नागनाथ, नम्रता नामदेव केंद्रे, सय्यद आयषा पाशा साब इत्यादी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी व पालक अशोक केंद्रे (गुरुजी) ,माधव बिरादार ,सय्यद पाशा, पुंडलिक केंद्रे ,हरिदास रणक्षेत्रे, भागवत रणक्षेत्रे, अतुल केंद्रे तुलसीदास जाधव ,लक्ष्मण भांगे व गावातील नागरिकांनी सुनील केंद्रे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.