बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी मयूर शिवपूजे यांची तर कार्याध्यक्षपदी एडवोकेट गंगाधर हिंगणे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : सबंध जिल्ह्यामध्ये भक्तांच्या नवसाला पावणार्या बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याची व्यापक बैठक दि.24 रोजी सायंकाळी सात वाजता वीरशैव मंगल कार्यालयात होऊन त्यात 2023 साला साठी बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी मयूर शरदराव शिवपुजे यांची सचिव पदी संतोष काडवादे यांची तर कार्याध्यक्षपदी एडवोकेट गंगाधर हेंगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक माधवराव पुणे, व्यासपीठावर मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राम तत्तापुरे, माजी नगरसेवक अभय मिरकले, माजी नगरसेवक राहुल शिवपुजे,अँड.निखिल कासनाळे, शिवकुमार उटगे, महादेव बोंडगे,राजकुमार स्वामी, नागेश हेंगणे, महालिंग पुणे, अमोल तत्तापुरे,संगमेश्वर शेटकार, गुरूलिंग स्वामी, नागेश कल्याणी,इरनाथ तत्तापुरे,गणेश बेंबळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी अध्यक्ष विशाल शेटकार यांनी गेल्या वर्षीच्या हिशोबाचे वाचन केले. उर्वरित कार्यकारणी उपाध्यक्ष योगेश शिवपुजे, गजानन मेनकुदळे, सहसचिव मयूर कुमदळे, कोषाध्यक्ष शिवकुमार बेद्रे, प्रमोद पाटील, कार्यकारणी सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मंडळाचेशिवकुमार उटगे, राजू कोरे, प्रफुल कल्याणी यांच्यासह कार्यकर्त्याची मनोगत पर भाषणे झाली. मार्गदर्शक राम तत्तापूरे यांनी आपल्या देशात गणेशोत्सवाला असाधारण महत्व असल्याचे सांगून संसदेतील अरध्यापेक्षा अधिक नेते या महोत्सवातून घडत असल्याचे सांगून सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मन लावून काम करण्याचे जाहीर आवाहन केले. अध्यक्षीयसमोरोप माधवराव पुणे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट किशोर कोरे यांनी तर आभार अभिजीत पुणे आणि मांनले. या बैठकीला यांच्यासह मंडळाचेसुनील कोरे, रोहित चौधरी, ओंकार पुणे,गजानन गादगे, बालाजी काडवादे, संगम शिवपुजे यांच्या सह पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.