चंद्रयान थ्री चंद्रावर यशस्वी पदार्पण यशवंत परिवाराच्या वतीने करण्यात आले स्वागत
अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान थ्री मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरून भारतानी इतिहास रचला. या ऐतिहासिक अविस्मरणीय यशाबद्दल यशवंत परिवाराच्या वतीने शास्त्रज्ञाचे मनःपूर्वक अभिनंदन करूनप्रार्थनेत त्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे हे होते.यावेळी मराठी विभाग प्रमुख राम तत्तापुरे यांनी बर्फाच्या स्वरूपात पाण्याचे साठे असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरला असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञ्याच्या श्रमाचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक करून चंद्र यानावर प्रकाश टाकून सर्व विद्यार्थ्यांनी डी डी सह्याद्री चॅनल किंवा युट्युब वर हे चंद्रयान पहावे असे जाहीर आवाहन केले. यावेळी उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्येवाड, निर्मला पंचगले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले.